योग विद्या गुरुकुल आगामी वर्ग

योग विद्या गुरुकुल अन्य कार्यक्रम

योग विद्या गुरुकुल वार्तापत्र

गुरुकुलविषयी

वर्षप्रतिपदा दि. १४ एप्रिल १९८३ रोजी नाशिक येथे योग विद्या गुरुकुल संस्थेची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी म्हणजे जून १९७८ पासून योग उद्या धाम या नावाने संस्थेचा कार्यविस्तार सुरूच होता.
आज योग विद्या गुरुकुलच्या अंतर्गत परीक्षा विभाग, योग महाविद्यालय ( कालिदास संस्कृत विद्यापीठ अंतर्गत ), योग निसर्गौपचार केंद्र, योग सुगंध मासिक, इंग्रजी वर्ग या विभागांचे कार्य सुरु आहे. योग विद्या गुरुकुलच्या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे. महारष्ट्रातील लहान खेड्यांपासून भारताबाहेरच्या १०४ देशांपर्यंत गुरुकुलचे एकूण १५,००० योग शिक्षक योग प्रसाराचे कार्य करीत आहे.
त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे तळवाडे गावाजवळ २५एकर जागेच्या अतिशय रम्य अश्या परिसरामध्ये गुरुकुलचा अतिशय देखणा असा विश्व योग दर्शन हा आश्रम उभा आहे. तेथे दरमहा ३० ते ३५ नागरीक टीचर्स ट्रेनिंग कोर्से पूर्ण करण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे ध्यान वर्ग, प्रगत अभ्यासक्रमाचे निवासी वर्ग यांचे आयोजन याच परिसरात केले जाते.
अधिक माहिती

योग सुगंध विषयी

योग सुगंध हे योग विद्या गुरुकुल चे मुखपत्र आहे गुरुकुलच्या नाशिक, महाराष्ट्रातील अन्य शहरे व गावे येथे चालणाऱ्या योग प्रचार कार्याचा आढाव योग सुगंधमध्ये घेतला जातो. तसेच महाराष्ट्राबाहेर आसाम, कर्नाटक, गोवा आणि अन्य देशांमध्ये सुरु असलेल्या गुरुकुल वर्गांची माहिती मासिकात उपलब्ध असते.
योगतज्ञांचे योगविषयक लेख, काही आकर्षक व माहितीपूर्ण सदरे, योगकाव्ये हे योग सुगंधचे विशेष आकर्षण आहे.

३५ वर्षाचा इतिहास
योग सुगंध मासिकास ३५ वर्षाचा इतिहास आहे. सर्वप्रथम ऑगस्ट १९७९ पासून योग विद्या धाम नाशिकतर्फे हे मुखपत्र सुरु झाले. मुखपत्राचे पहिले तीन अंक योग साधना या नावाने सुरु झाले. ती केवळ पाच पानाचे मासिक पत्रिका होती. योग विधया धाम चे संस्थापक कें.बाळासाहेब लावगंकर यांचे दुसऱ्या पुण्यस्मरण दिवशी तिचे प्रकाशन करण्यात आले.

आतापर्यंत योगासुगंध चे एकून ३४ वर्षाचा प्रवास आणि ३८५ अंकाचे प्रकाशन झालेले आहे.
योगासुगंध चा प्रवास :
योग साधना – १९७९ ऑगस्ट / सेप्टेम्बर / ऑक्टोबर – 3 महिने 3 अंक
योगचितन – १९७१ नोव्हेंबर ते 2000 जुन - २१ वर्ष २३८ अंक
योग्सुगंध २००० सेप्टेम्बर ते आजपर्यंत २०१६ – १५ वर्ष १८० अंक

योग बुलेटिन (इंग्रजी) श्री गंधार मंडलिक आणि सौ. भाक्तीरत्न मंडलिक यांनी इंटरनेटवर योग विधया गुरुकुलच्या बातमी पत्राला प्रयोगात्मक सुरवात केली आहे. www.yogapoint.com या वेबसाईट वर हे बुलेटिन प्रसारित केले जाते.
अधिक माहिती

योगसुगंध प्रकाशनाचा चालू अंक

पाहण्यासाठी क्लिक करा


आपल्या " योग, निसर्गोपचार व आरोग्य विषयक " प्रश्नांच्या उत्तरासाठी संपर्क साधा guruji.freeseva@gmail.com

योग विद्या गुरुकुल

योग, ध्यानधारणा साठी अतिशय उत्तम एक परिपूर्ण ठिकाण आहे.आकर्षक क्षेत्रफळ,नैसर्गिक संपदा योग शिकण्यासाठी खूप प्रोत्साहन देते.

अधिक माहिती  

योग सुगंध

योग सुगंध मासिकास ३५ वर्षाचा इतिहास आहे. आतापर्यंत योगासुगंध चे एकून ३४ वर्षाचा प्रवास, ३८५ अंक प्रकाशन झाल आहे.

अधिक माहिती  

परीक्षा विभाग

योगाची परिपूर्ण माहिती आणि उत्तम प्रकारे योगाचे फायदा विध्यार्थी यांना व्हवा म्हणून संस्थे मार्फत योगाचे विविद परीक्षा घेतले जातात

अधिक माहिती  

योग महाविद्यालय

ज्यांना योग मध्ये एक उत्तम आणि उज्वल भविष्य कराचे आहे, त्यांच्यासाठी संस्थे मार्फत योग महाविध्यालय सुरु केले आहे, ज्याच्या मध्ये योग बद्दलचे खूप काही कोर्से उपलब्ध आहे

अधिक माहिती  

आरोग्यधाम निसर्गउपचार

उत्तम आणि समृद्ध आरोग्यासाठी संस्थे मार्फत अधिक सुख सोये उपयुक्त निसर्गौप्चार केंद्र सुरु केले आहे, आणि याचा खूप फायदा लोक घेत आहे.

अधिक माहिती  

पिची फिप्सन निसर्गउपचार

उत्तम आणि समृद्ध आरोग्यासाठी संस्थे मार्फत अधिक सुख सोये उपयुक्त निसर्गौप्चार केंद्र सुरु केले आहे, आणि याचा खूप फायदा लोक घेत आहे.

अधिक माहिती